मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या रॅलीने वेधले अमळनेरकरांचे लक्ष

अमळनेर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे दिनांक १४ रोजी रात्री मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचे मार्गदर्शनाखाली हातात तिरंगा ध्वज व पेटती मशाल घेऊन रॅली काढण्यात आली. मंगळ ग्रह मंदिरापासून रात्री १० वाजता रॅली निघाली. सुरुवातीला राणी लक्ष्मी चौकात हुतात्मा स्तंभास अभिवादन व माल्यार्पण करण्यात येऊन रॅली थेट सुभाष चौकात पोहोचली.

या रॅलीत मंगळ ग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, सेवेकरी आर. टी. पाटील, पुषंद ढाके, राहुल पाटील, शरद कुलकर्णी आदीे सहभागी झाले होते. सर्वांनी हातात तिरंगा ध्वज व पेटती मशाल घेतल्या होत्या. ‌‘भारत माता की, जय…‌’, ‌‘वंदे मातरम्‌‍…‌’ आदी घोषणांनी सेवेकरांनी परिसर दणाणून गेला होता. देशभक्तीपर गीतांमुळे परिसर चैतन्यमय झाला होता. रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पू. सानेगुरूजी, सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. सुभाष चौकात रात्री ठिक १२ वाजता ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीताने रॅलीची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!