राष्ट्र सेवा दलाच्या वतीने अमळनेेर येथे स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम घडीला ॲड. ललिता पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण

अमळनेर : येथील सुभाष चौकात राष्ट्र सेवा दलाच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १२:०१ वाजता म्हणजेच १४ ऑगस्टला मध्यरात्री स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम घडीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. फिनिक्स सोशल अवेअरनेस गृपच्या व जिजाऊ बहुउद्देशीय शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पवार, सतिष देशमुख, डॉ. मिलिंद वैद्य, भारती गाला, सुधाकर देशमुख, धनंजय सोनार, डॉ. उदयकुमार खैरनार, श्रीराम चौधरी, जितेंद्र वाणी, अमोल येवले, धर्मेश निकम, प्रशांत बडगुजर, प्रशांत चव्हाण, शुभांगी धनंजय सोनार आदी सर्व ज्येष्ठ राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते यांच्या सहभागाने हा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अनिता सुर्यवंशी व अनेक महिलांची उपस्थिती होती. अपेक्षा पवार व त्यांच्या ‘अपेक्षा म्युझिकल गृप’ ने राष्ट्रभक्ती पर गीतांचे सुमधुर सादरीकरण केले. या प्रसंगी सालाबादा प्रमाणे मंगळग्रह मंदिराचे वतीने निघणारी मशाल रॅली कार्यक्रम स्थळी सहभागी झाल्याने कार्यक्रमास रंगत आली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!