द्रौ. रा. कन्याशाळेत संस्कृत दिवस साजरा

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित द्रौ. रा. कन्या शाळेत गुरुवार, दि. २२ ऑगस्ट रोजी संस्कृत दिवस साजरा करण्यात आला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संस्कृत विषयाच्या उपशिक्षिका पी.पी.जोशी यांनी यावेळी विद्यार्थिनींना प्राचीन काळापासून असलेले संस्कृत भाषेचे महत्व, त्याची व्याप्ती याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थिनींनी गणेश पंचरत्न, शिव तांडव स्तोत्र, मधुराष्टक व संस्कृत भाषेत पोवाडा सादर केला. यावेळी संस्कृत ऑलिम्पियाड परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. विद्यापीठाकडून मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी यांचा गौरव झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक व्ही. एम. कदम, पर्यवेक्षिका एस. पी. बाविस्कर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!