ग्रंथालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपविभागीय अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी

अमळनेर : शहरातील अमळनेर हे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित झाले. अमळनेर शहरातील पाच संस्थांना ‘पुस्तकांचे गाव’ योजनेअंतर्गत प्रत्येकी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले. यात, अमळनेर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात ग्रंथालय निर्मिती व अनुदानाबाबत एकाही गावाचा समावेश नाही. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील २५ गावातील ग्रंथालयांची निवड करून त्यांना ग्रंथालय निर्मितीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयाचे अनुदान द्यावे. अशी मागणी उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे पदाधिकारी प्रा. अशोक पवार, प्रकाश पाटील, सुनील अहिरराव, संजय पाटील, विजय पाटील, चंद्रकांत पाटील, नरेंद्र पाटील व गांधली, पिळोदे येथील वाचकप्रेमी उपस्थित होते.
