साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने माजी आमदार साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनी अभिवादन

अमळनेर : तालुक्याचे माजी आमदार तथा साथी गुलाबराव वामनराव पाटील यांनी शाळा काढून अनेक पालकांना शैक्षणिक आधार दिला. आपल्या कार्य कर्तृत्वाने संपूर्ण तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला असे गौरवोद्गार काढत बापूंचे प्रथम पुण्यस्मरण दिनी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे साने गुरुजी विद्यालयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख यांनी स्वर्गीय साथी गुलाबराव पाटील यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थी व उपस्थितांना माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते बापूसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना गायिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, गुणवंतराव पाटील, ॲड. अशोक बाविस्कर, डॉ. यशवंतराव देशमुख, अमृत पाटील, भास्करराव बोरसे, ए. जे. शेख, किरण पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, चव्हाण मॅडम आदी उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!