तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना दिले निवेदन

अमळनेर : बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी येथील शिवसेना उबाठा पक्षातर्फे तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना आज निवेदन देण्यात आले. बदलापूर घटनेमधील बलात्कारी नराधमास क्रूर कृत्ये केल्या बाबत फाशीची शिक्षा द्यावी, झालेल्या या प्रकारा बाबत जलद गतीने न्यायालयात खटला चालविण्यात यावा. जर त्या नराधमास फाशीची शिक्षा झाली नाही तर अश्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात जास्त घडण्याची शक्यता आहे असे निवेदनात म्हटले आहे. सदर व्यक्तीला शिक्षा न झाल्यास पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल याची कृपया नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण देशाला अस्वस्थ करणारे आहे. यामुळे ‘लाडकी बहीण म्हणून आम्हाला पैशाची भीक नको… आमची लेक आम्हाला सुरक्षित हवी’ अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन रस्त्यावरुन तहसील कचेरीवर मोर्चा काढून झालेल्या घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उबाठा चे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, विजय काशिनाथ पाटील, बाळासाहेब नितीन निळे, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक दादा पवार, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र मराठे, तुळशीराम कोळी, गोरख पाटील, ज्ञानेश्वर गंगाराम पाटील, रवी पाटील, हिरालाल भिल, नितीन पाटील, मोहन भोई, उमेश अंधारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
..