ठाणे येथे कोळी दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण

अमळनेर : अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे केंद्र असलेल्या ठाणे येथील मराठी साहित्य मंडळा चे वतीने सामाजिक योगदानाबद्दल बापूराव पाटील (अमळनेर) यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार तर चेतन पणेर (नाशिक) यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर केले होते. ठाणे येथील मराठी ग्रंथालय सभागृह येथे मराठी साहित्य मंडळाने शानदार सोहळा आयोजित करुन मान्यवरांचे हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक सिद्धेश्वर कोळी होते. अन्य प्रमुख मान्यवरात स्वागताध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश धुमटकर, कवी संमेलनाच्या अध्यक्षा शांता गिरबने, घनश्याम पांचाळ, सिध्दार्थ कुलकर्णी, ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, ज्येष्ठ कवी राजेश थळकर, सुधाकर सुसलादी, विद्या थोरात काळे, विद्या वाहुळे आदी उपस्थित होते. सूत्र संचालन अनधा जाधव यांनी केले. यावेळी कोळी दिनानिमित्त ३० कवींनी आपल्या आगरी कोळी भाषेत कवितांचे सादरीकरण केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!