श्री मंगळग्रह मंदिरात श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना

अमळनेर : भाद्रपद शुद्ध पक्षातील चतुर्थी अर्थात श्री गणेश चतुर्थीनिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य मानकरी म्हणून अमळनेर महिला मंच च्या सदस्या व तालुक्यातील टाकरखेडा येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. रेखा वाल्मीक मराठे यांच्या शुभहस्ते आज शनिवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अतिशय मंगलमय व चैतन्यमयी वातावरणात श्री गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.

यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शहरातील विविध महिला मंडळाच्या सदस्यांच्या हस्ते सकाळी व संध्याकाळी महाआरतीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. पुरोहित जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी मंत्रोच्चारात प्रधान संकल्प करून गणपती पूजन व वरुण पूजन केले. त्यानंतर श्री गणेशमूर्तीची महाआरती झाली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, तसेच मंदिराचे सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!