मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने होणार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकांचे स्वागत व सन्मान

अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था व देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक एकची पत्रकार संघटना अर्थात व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या सातव्या, नवव्या व अकराव्या दिवशी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांचे दगडी दरवाजासमोर स्वागत होणार आहे. मंगळ ग्रह सेवा संस्था दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबवित असते. याची देशभरातील अनेक संस्थांनी दखल घेऊन मंगळ ग्रह सेवा संस्थेला विविध पुरस्कारांनी सन्मानित गौरविण्यात आले आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांसाठी लढा देणारी, एक वेगळेपण जपणारी संघटना आहे. संघटनेमार्फत पत्रकारांसाठी कौशल्य शिक्षण, विमा संरक्षण, आरोग्य तपासणी, निवासी जागा, पेन्शन, पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, सामाजिक बांधिलकी अशा विविध योजना राबविण्यात येतात.

गणेश मंडळांना सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमाची तयारी.

त्याचाच भाग म्हणून मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया या दोन्ही संस्थांच्या वतीने सातव्या (दि. १३) , नवव्या (दि. १५) व अकराव्या (दि. १७) या तारखेच्या शहरातील निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांचे अमळनेेर शहरातील दगडी दरवाजाजवळ कार्यक्रमस्थळी स्वागत करुन फ्रेम केलेले सन्मानपत्र ही देणार असल्याचे दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कळविण्यात आले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!