जिद्दीच्या जोरावर देवेंद्र ची मुंबई हायकोर्टात शिपाई पदी निवड

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सत्कार

अमळनेर : तालुक्यातील देवगाव देवळी गावातील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थ्यांनी ‘संघर्ष अभ्यासिका’ वर्ग सुरु करुन आपल्या भविष्यातील स्वप्नांसाठी स्वतःला झोकून दिले आहे. जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी हे तीन गुण असले तर विद्यार्थी आपण पाहिलेल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात हे माजी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक मिळवत सिध्द करुन दाखविले आहे. विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आताच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. देवगांव देवळी, ता.अमळनेर येथील भिला रामचंद्र पाटील यांचा मुलगा महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेरचा माजी विद्यार्थी आहे. देवेंद्र (नानु) भिला पाटील या विद्यार्थ्याने भाजीपाला व्यतिरिक्त जे काम मिळेल ते काम इमाने इतबारे केले. जिद्द, आत्मविश्वास असल्याने परीक्षा देत राहिला.. अखेर त्याने यश मिळविले. त्याची मुंबई हायकोर्टाच्या शिपाई पदी निवड झाली आहे.

आमच्या महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे माजी विद्यार्थी जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये यश संपादन करुन त्यांची निवड होऊन नोकरीला लागतात.. तो क्षण आम्हाला खूप मोठा आनंद देणारा असतो. अशा यशस्वी विद्यार्थ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी सत्कार करण्याचे भाग्य आम्हाला लाभते.
…. अनिल महाजन, मुख्याध्यापक,
महात्मा जोतीराव फुले हायस्कूल, देवगांव देवळी.

देवेंद्र पाटील या विद्यार्थ्याला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. महात्मा फुले हायस्कूलमध्ये त्याचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिक्षक आय. आर. महाजन, एस. के. महाजन, एच. ओ. माळी, अरविंद सोनटक्के व शिक्षकेतर कर्मचारी संभाजी पाटील यांनी सत्कार करीत भावीवाटचीलीस शुभेच्छा दिल्या.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!