कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणाऱ्या अमळनेर शहरातील गणेश मंडळे व गणेश भक्तांच्या सन्मानासाठी आम्ही आहोत सज्ज !

गणेश विसर्जनाच्या सातव्या दिवशी मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया यांचे संयुक्त विद्यमाने गणेश मंडळांचा केला यथोचित सन्मान; विसर्जनाच्या नवव्या व अकराव्या दिवशीही सन्मान होणार

अमळनेर : येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम राबवित नावलौकिकास पात्र ठरली आहे. सालाबादाप्रमाणे मंगळ ग्रह सेवा संस्था व देशातील सर्वात मोठी आणि क्रमांक १ ची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या सातव्या दिवशी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांचे दगडी दरवाजासमोर उभारण्यात आलेल्या भव्य मंचावर सायंकाळी ७ ते रात्री ११ वेळेत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे दोन्ही संस्थांकडून फ्रेमसह सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले.

विसर्जनाच्या सातव्या दिवशी (दि.१३) शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढून ठरवून दिलेल्या वेळेत गणेश विसर्जन करणाऱ्या आदर्श मंडळांचा सन्मान करण्यात आला. अमळनेर पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त व मंचावरुन वेळोवेळी स्पिकर वरुन सूचना देण्यात आल्याने कोणताही गोंधळ दिसून आला नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वधर्मीय आदर्श गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा उत्साह वाढलेला होता. यावेळी अनेकांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करत उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा नववा दिवस व दिनांक १७ सप्टेंबर रोजी अकराव्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. या दोन दिवशी देखील कायदा व सुव्यवस्था राखून विसर्जन करणाऱ्या गणेश मंडळांना मंगळ ग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडिया कडून स्वतंत्र फ्रेम्स सन्मानपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.

सातव्या दिवशी पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त

दिनांक १५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचा नववा दिवस व दिनांक १७ सप्टेंबर रोजी अकराव्या दिवशी गणेश विसर्जन करणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती देऊन सन्मानपत्र घेऊन जावे अशी आग्रही विनंती दोनही संस्थांचे पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!