माजी मंत्री रोहिदास पाटील (दाजी) यांचे वृद्धापकाळाने निधन

धुळे : खान्देशचे कॉंग्रेस नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील (दाजी) यांनी आज शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ८९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी राज्यात विविध खात्याचे मंत्रीपदे भुषविली आहेत. रोहिदास पाटील यांचे अख्खं आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेलं. साहजिकच काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही अंत्यविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अंत्यदर्शन शनिवार, दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७  ते १० वाजेपर्यंत नेहरु हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.  सकाळी ११ वाजता नेहरु हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवास स्थानापासून अंत्ययात्रा निघून एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राऊंडवर आणले जाईल व तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीण चे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील आहेत. त्यांच्या पश्चात २ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!