व्हाॅईस ऑफ मिडीया ही फक्त संघटना नसून एक परिवार; भविष्यातही नावलौकिक होईल असेच काम करु : डॉ. डिगंबर महाले

डॉ. डिगंबर महाले यांची व्हाॅईस ऑफ मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल झाला सत्कार

व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर टीम डॉ. डिगंबर महाले यांचा सत्कार करताना

अमळनेर : व्हाॅईस ऑफ मिडीया ही फक्त संघटना नसून एक परिवार आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य आणि मला चांगलं काम करण्यासाठी परमेश्वराने दिलेली शक्ती हेच या निवडीचे खरं सत्य आहे, मी नाममात्र आहे. भविष्यात व्हाॅईस मीडियाच्या संघटन व विविध कार्यक्रमांवर भर देऊन संघटनेचा नावलौकिक होईल असेच काम करु असे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस डॉ. डिगंबर महाले यांनी सत्काराला उत्तर देताना आश्वासित केले. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकी द्वारे नुकतीच दिनांक २२ सप्टेंबर रोजी पार पडली. या निवडणुकीत डॉ. डिगंबर महाले यांची व्हाॅईस ऑफ मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाली. या पार्श्वभूमीवर मंगळग्रह मंदिर येथे नुकताच अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते. व्हॉईस ऑफ मीडिया, अमळनेर येथे येथील सर्व पदाधिकारी व सदस्यांतर्फे शाल, पुष्पगुच्छ व सुंदर अशी छत्रपती शिवरायांची आसनस्थ मूर्ती भेट देऊन डॉ. डिगंबर महाले यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. डिगंबर महाले हे येथील मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष असून यापूर्वी व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष होते. व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून त्यांचे उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्वसमावेशक कार्य पाहता त्यांची राज्य कार्यकारी निवड होईल याची खात्री होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी त्यांना भरघोस मतदान करुन विजयश्री खेचून आणत प्रदेश सरचिटणीस पदी त्यांची निवड झाली. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त प्राध्यापक धर्माधिकारी सर, मंगळग्रह संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, व्हाॅईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष उमेश काटे, दयानंद पाटील, मिलिंद पाटील, भाऊसाहेब देशमुख यांचेसह अनेकांनी आपल्या शब्दात डॉ. डिगंबर महाले यांच्या कार्याची प्रशंसा करत अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जो बोलता नहीं, वह करके दिखाता है.. और जो बोलता है, वह करता नहीं I

डॉ. डिगंबर महाले यांची व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड ही पत्रकारांसाठीच नव्हे तर अमळनेरकरांचा बहुमान असल्याचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी म्हणाले. गणेश विसर्जन काळात मंगळग्रह सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बडेजाव न करता तीन दिवस राबविलेल्या उपक्रमांची सर्वत्र दखल घेतली गेली. अर्थातच.. ‘जो बोलता नहीं, वह करके दिखाता.. और जो बोलता है, वह करता नहीं’ याचा प्रत्यय आला. डॉ. डिगंबर महाले यांची ओळख आता उत्तर महाराष्ट्र एवढीच नसून राज्य पातळीवर झाली आहे. गणपती बाप्पा कडून मिळालेला हा प्रसाद असावा. यापुढील काळात प्रदेशाध्यक्ष पदी बघायचेय असे सांगत सूर्यवंशी यांनी शुभेच्छाही दिल्या.

मनोगतात व्हाॅईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे यांनी डॉ. डिगंबर महाले यांचा पत्रकारिता व सामाजिक कार्याविषयी अनुभव सांगितले. संघटनेत महाले सरांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष म्हणून सोपविलेली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडू असे सांगितले. कार्यक्रमाचे दरम्यान गेल्या महिन्यात सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाल्याबद्दल बापूराव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. याशिवाय व्हाॅईस ऑफ मीडिया परिवारात नव्याने सदस्य पद स्विकारलेल्या निरंजन पेंढारे, दयाराम पाटील, किरण चव्हाण, भाऊसाहेब देशमुख यांचे स्वागत तसेच एका गणेश मंडळांच्या भक्तांचे स्वागत डॉ. डिगंबर महाले व पदाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी मंगळग्रह संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, बाळासाहेब पवार, व्हाॅईस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, जिल्हा संघटक जयेशकुमार काटे, तालुकाध्यक्ष उमेश काटे, उपाध्यक्ष गौतम बिऱ्हाडे, सचिव जितेंद्र पाटील, सहसचिव ईश्वर महाजन, कोषाध्यक्ष रवींद्र मोरे, ज्येष्ठ सल्लागार विवेक पाटील, उमेश धनराळे, सदस्य जयंत वानखेडे, बापूराव ठाकरे, राहुल पाटील, मिलिंद पाटील, रविंद्र बोरसे, उमाकांत ठाकूर, किरण चव्हाण, निरंजन पेंढारे, शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, दयाराम पाटील, भाऊसाहेब देशमुख, शरद कुलकर्णी, रमण भदाणे, प्रकाश जैन, मधुसूदन विसावे, सुखदेव ठाकूर, आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळग्रह संस्थानचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!