RUSA अंतर्गत NTW-IT 2024 या एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेतून २०० प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले प्रशिक्षण
अमळनेर : रसायनशास्त्र विभाग व रसायनशास्त्र शिक्षक संघटना (ACT) क.ब.चौ.उ.म.वि,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) अनुदानातून एक दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा “Instrumentation Techniques (UV-Visible, FTIR, STA)” या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.
प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अरुण बी. जैन, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.जी.एच सोनवणे, सचिव रसायनशास्त्र शिक्षक संघटना (ACT), अध्यक्ष रसायनशास्त्र अभ्यास मंडळ, कबचौ उमवि, जळगाव, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. नवीनचंद्र शिंपी (रसायनशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ,सांताक्रुज), संसाधन प्रशिक्षण तंत्रज्ञ म्हणून अजित कुमार नादाल (अनाटक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई) व अनिल विसपुते (श्री इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर अँड रिसर्च लॅबोरेटरी जळगाव) यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.पराग पाटील, खा.शि.मंडळाचे सहसचिव तथा अधिसभा सदस्य डॉ. धिरज वैष्णव, डॉ. मुकेश भोळे (रुसा अंतर्गत गुणवत्ता व अभिवचन कक्ष), महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य पी. आर. शिरोडे, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. गुजराथी आदी उपस्थित होते.
कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राध्यापिका, संशोधक विद्यार्थी व विविध महाविद्यालयातील असे एकूण २०० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत किसान कॉलेज पारोळा, ए सी एस कॉलेज धरणगाव, स्कूल ऑफ केमिकल सायन्स कबचौ उमवि, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय जळगांव, एमजीएम डीडीएसपी कॉलेज चोपडा, एस पी एम राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, डी डी एस पी कॉलेज एरंडोल, एस डी एन कॉलेज फैजपुर, एमजी व्ही एल व्ही एच कॉलेज पंचवटी नाशिक, तुळजाराम चतुरचंद कॉलेज बारामती आदी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदवून प्रशिक्षण घेतले. सौ. प्रा. स्नेहल सूर्यवंशी यांच्या शारदा स्तवनाने कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा रसायनशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश पवार यांनी केले. प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी विभागातील केंद्रीय उपकरण प्रयोग शाळेत असलेल्या विविध अशा उपकरणांची माहिती व तंत्र अवगत करून, आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले साधन कौशल्य विकसित करावे, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.गुणवंत एच सोनवणे यांनी तंत्रज्ञ कौशल्य ही काळाची गरज आहे व या तंत्रज्ञ कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विषया सोबत इतर भौतिक विज्ञान, पदार्थ विज्ञान, औषधोत्पादन अशा विविध क्षेत्रात संधी निर्माण करता येऊ शकते, असे मत मांडले. प्रा. डॉ. नवीनचंद्र शिंपी यांनी “Materials Characterization and Analysis” या विषयावर आपले व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये प्रात्यक्षिक व साधन प्रशिक्षण तंत्रज्ञ यांचा एकमेकांशी कसा संबंध येतो, हे विद्यार्थ्याला समजावून सांगितले. नॅनो मटेरियल च्या वेगवेगळ्या पातळीवरच्या अनॅलिसिस पद्धती समजावून सांगितले. साधन कौशल्य तंत्रज्ञ अजित कुमार नादार यांनी FTIR Spectrophotometer, अनिल विसपुते व त्यांच्या सहकाऱ्यांनी HPLC व UV-Visible स्पेक्टोफोटोमीटर या उपक्रमाबद्दल तसेच विभागातील डॉ.मिलिंद ठाकरे व प्रा. रामदास सुरळकर यांनी त्यांच्यासोबत UV-Visible Spectrophotometer चे मार्गदर्शन केले, Simultaneous Thermal Analyzer (STA) या उपकरणावर डॉ. ए. पी. मानके, प्रा. डॉ. तुषार रजाळे व प्रा. प्रितम बोरसे यांनी, Microwave Synthesizer वर प्रा. एस. एस. दिपके यांनी, Ultrasonicator Bath डॉ. विवेक बडगुजर व प्रा.हर्षल सराफ यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण कार्यशाळेत एकूण सात उपकरणाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना विभागातील प्राध्यापक व सहकारी प्रा. विवेक पाटील, प्रा. मितेश भंडारी, प्रा.सौ. प्रियंका देसले, प्रा. सौ. प्रियंका पाटील यांच्या मदतीने देण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवी बाळसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.वैशाली राठोड यांनी मानले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपप्राचार्य आणि माजी IQAC Coordinator प्रा. डॉ.जयेश आर गुजराथी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. समारोपाचे प्रमुख पाहुणे अजित कुमार नादाल, अनाटेक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई होते. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना कार्यशाळेचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. समापन कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधून कुमारी कल्याणी चौधरी ने विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आपल्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्याबद्दल संस्थेचे व प्राचार्यांचे आभार मानले. सर्वांचे आभार प्रा.मनीषा मोरे यांनी मानले. विभागातील कर्मचारी दिपक बाविस्कर, सुनील बैसाणे, सुधाकर कोळी, प्रकाश डंबेलकर, कुंदन निकम व जगदीश शिंगाणे, विवेक तेले यांनी कार्यक्रमाचे आयोजनात सहकार्य केले. डॉ. रवी बाळसकर यांनी अहवाल सादर केला. सचिव प्रा. एस. एस. दिपके यांनी कार्यशाळेचा समारोप केला. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, प्राध्यापक वृंद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.