खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते होईल शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन
अमळनेर : येथील मराठी वाङ्मय मंडळाचे प्रा.आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेर तर्फे दि. ३ ते ७ ऑक्टोबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेरकरांसह रसिकांसाठी पर्वणी असणारी शारदीय व्याख्यानमाला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथे दररोज सायंकाळी ६.३० वाजता होईल. मा.स्मिता उदय वाघ, खासदार जळगाव यांच्या हस्ते शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल.
- पहिल्या दिवशी दि. ३ ऑक्टोबर रोजी उदय निरगुडकर, मुंबई यांचे ‘भारत काल, आज आणि उद्या’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले जाईल. प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. डिगंबर महाले असतील.
- दि. ४ ऑक्टोबर रोजी ॲड. आशिषजी जाधवर, छ.संभाजी नगर हे ‘भारतीय संविधान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफतील. मा. ॲड. श्रावण एस. ब्रह्मे व विलास दयाराम शिंदे प्रमुख अतिथी असतील.
- दि. ५ ऑक्टोबर रोजी शाहीर शिवाजीराव पाटील, नवरदेवळा हे ‘रंग शाहिरी कलेचा’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफतील. प्राचार्य के. डी. पाटील व डॉ. शरद दयाराम शिंदे प्रमुख अतिथी असतील.
- दि. ६ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. संजय कळमकर, अहिल्यानगर हे ‘जगण्यातील आनंदाच्या वाटा’ या विषयावर चौथे पुष्प गुंफतील. डॉ. संदीप जोशी व डॉ. मयुरी जोशी प्रमुख अतिथी असतील.
- दि. ७ ऑक्टोबर रोजी समारोपाचे पुष्प गुंफले जाईल. समारोपा वेळी कवी प्रा. प्रवीण दवणे, ठाणे हे ‘दीपस्तंभ मनातले.. जनातले’ या विषयावर पाचवे पुष्प गुंफतील. डॉ. अनिल शिंदे प्रमुख अतिथी असतील.
या व्याख्यानमालेस उपस्थितीचे आवाहन मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्विकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी केले आहे.