अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत संख्याशास्त्र विभागामार्फत नुकतेच दिनांक ५ ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. एल. शिंदे यांचे “Estimation of Population Proportion under Sensetive Questions” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन होते. दैनंदिन जीवनात संख्याशास्त्र कशी महत्त्वाची भूमिका बजावते ? नियमित किंवा वास्तविक जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यातून महत्वपूर्ण निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकीय दृष्टिकोन कसा महत्त्वाचा ठरतो ? तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेत संख्याशास्त्रीय ज्ञान कशा पद्धतीने वापरले जाते ? याशिवाय संवेदनात्मक प्रश्नांतर्गत एकूण लोकसंख्येपैकी असणारी आकडेवारी किंवा टक्केवारी कशी शोधावी यासाठी संख्याशास्त्रातील महत्त्वपूर्ण अशा दोन सांख्यिकीय पद्धतींचा, “Warner’s” पद्धत आणि “Simmons” पद्धतीचा वापर कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले. आणि या माहितीचा आपल्या सामाजिक संवेदनशील प्रश्नांची उकल करण्यासाठी कसा फायदा होऊ शकतो हे प्रात्यक्षिकाद्वारे पटवून दिले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी संख्याशास्त्र विषयाचे प्रत्येक क्षेत्रात असणारे महत्त्व विशद केले. संख्याशास्त्र विषय हा जवळजवळ सर्वच कार्यालयांमध्ये वापरला जातो. संख्याशास्त्र विषयाला विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे महत्त्व सरांनी पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संख्याशास्त्र विभागाचे इन्चार्ज प्रा. उमेश येवले यांनी केले. याप्रसंगी संख्याशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ. पी. बी भराटे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा. जे. सी.अग्रवाल, प्रा. जे. बी. जैन, प्रा. नलिनी पाटील तसेच इतर सहकारी प्रा. मोहिनी साळी, प्रा. प्रियंका बागुल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भावना खैरनार यांनी केले तर आभार प्रा.अश्विनी कोळी यांनी मानले. संख्याशास्त्र विभागातील कर्मचारी गुणवंत वाघ आणि चंद्रकांत ठाकूर, दिपक चौधरी यांचे कार्यक्रमाचे नियोजनासाठी सहकार्य लाभले. सदरच्या समारंभाकरिता खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सीए निरज अग्रवाल, प्राचार्य डॉ. अरुण जैन, संस्थेचे सहसचिव डॉ.धिरज वैष्णव, डॉ. विजय तुंटे, डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य डॉ. अमित पाटील यांच्यासह संख्याशास्त्र व करिअर कौन्सलिंग सेंटरच्या कर्मचारी उपस्थित होते.