अमळनेर : प्रताप कॉलेज, अमळनेर येथील Incubation and Innovation Centre च्या वतीने ८ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘ग्रामीण भागातील उद्योजकतेचा विकास आणि संधी’ Entrepreneurship development and possibility in rural areas या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रायोजक राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) होते. प्रमुख अतिथी अभियंता विनायक पाटील (स्टार्टअप इंडिया मेंटर, NISBUD, नोएडा मास्टर ट्रेनर) यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यान कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय तुंटे होते, तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. निलेश पवार होते.
अभियंता विनायक पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नोकरी आणि उद्योजकता यातील फरक, तसेच उद्योजकतेच्या फायद्यांवर भर दिला. यशस्वी उद्योजकात आवश्यक नेतृत्व, निर्णयक्षमता, आणि नवीन कल्पनांची निर्मिती यांसारख्या गुणधर्मांवर चर्चा केली. विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि साधनांची माहिती दिली. उद्योजकतेची संशोधन, व्यवसाय योजना, संसाधन व्यवस्थापन, आणि अंमलबजावणी या चार टप्प्यांची प्रक्रिया स्पष्ट केली. ग्रामीण भागातील कृषी, अन्न प्रक्रिया, हस्तकला यासारख्या क्षेत्रांतील संधींचे महत्त्व, उद्योजकतेतील अडचणी आणि उपाय, तसेच सरकारी योजनांचे लाभ ( मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया) यांचे महत्त्व विनायक पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQAC समन्वयक प्रा. मुकेश भोळे, प्राचार्य डॉ. अरुण जैन तसेच महाविद्यालय व्यवस्थापन यांचे विशेष योगदान होते. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विनायक पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन पाटील यांनी केले. प्रा.रोहन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. रवी बाळसकर, प्रा. डॉ. माधव भुसनर, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. जयेश साळवे, आणि दिपक चौधरी यांनी परिश्रम घेतले.