अमळनेर : परभणी जिल्हा पालम येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. घ. ना. पांचाळ यांची नुकतीच मराठी साहित्य मंडळच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उपाध्यक्षा ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे यांच्या शिफारशीनुसार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी त्यांची निवड केली आहे. सदर निवडीचे पत्र त्यांना आमदार संजय केळकर व ज्येष्ठ पत्रकार तथा ख्यातनाम विचारवंत मधुकर भावे यांच्या हस्ते त्यांना ठाणे येथे साहित्य मेळाव्यात नुकतेच प्रदान करण्यात आले.
आजपर्यंत मराठी साहित्य मंडळाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये साहित्य मंडळाचा विस्तार वाढवून एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. साहित्य मंडळाने एवढी मोठी झोप घेतली आहे की, आज साहित्य मंडळाचे जवळपास 20,500 च्या वर सभासद असून नवोदित लेखकांना तसेच कवींना विचारमंच उपलब्ध करुन दिला आहे. अव्यक्त लोकांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच आज राज्यांमध्ये साहित्य मोठ्या प्रमाणात झालेले श्रेय मराठी साहित्य ज्येष्ठ साहित्यिक उर्फ कवी गोलघुमट यांना यांची निवड झाल्यामुळे आनंद व्यक्त केला. महाराष्ट्रासह अनेक संमेलने दिसून येतात. याचे सर्व श्रेय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांना जाते.
नगर येथील बाळासाहेब देशमुख, जळगाव येथील बापूसाहेब पाटील ठाकरे, नाशिक येथील योगेश रोकडे, वर्धा येथील लता हेडाऊ, नागपूर येथील निता चिकाटे, अमरावती येथून ऍडव्होकेट निता कचवे, कोल्हापूर येथून रेखा दीक्षित, कटाड येथून सुरेश लोहार, विनायक जाधव, पुणे येथून डॉ निता बोडके, ठाणे येथून एकनाथ देसले, जालना येथून प्रा सुदर्शन तारक परभणी येथून डॉ. संगीता अवचार तसेच बळीराजा शिक्षण संस्थेचे संस्थापक / संचालक भाई लक्ष्मणटावजी गोळेगावकर, मा. तुषार भैय्या गोळेगावकर, प्राचार्य डॉ.एच.टी. सातपुते, प्राचार्य डॉ. आत्माराम आरसुळे आदींनी अभिनंदन केले असून सबंध महाराष्ट्रातून साहित्य वर्तुळात तसेच राज्यभरातून डॉ घनश्याम पांचाळ यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,