शारदीय नवरात्रौत्सव निमित्त मंगळग्रह मंदिर येथे भक्तिमय वातावरणात नवचंडी महायाग ; दोन सत्रात १८ यजमान

अमळनेर : शारदीय नवरात्रौत्सव निमित्त श्री मंगळग्रह मंदिर, अमळनेेर येथे बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ५ या दोन सत्रात अतिशय भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील १८ यजमान सहभागी झाले होते. राज्यात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची व विश्वातील एकमेव असलेल्या भूमीमातेच्या प्रतिमेची आरास भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सोबतच महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी यांच्या प्रतिमांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यंदाही नवचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले. महायाग प्रसंगी श्री गणपती पुण्यवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तू पूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषश्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजा, दुर्गा सप्तशती पाठांचे हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान, पूर्णाहुती करण्यात आली. त्यानंतर महाआरती झाली.

महायाग पूजेसाठी जितेंद्र अग्रवाल, दशरथ लांडगे, ॲड. विवेक लाठी, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. प्रितम जैन, प्रकाश पाटील, मनोहर नेरकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशांत कुडे, प्रदीप पारख, मनीष जोशी, प्रकाश वाघ, गणेश कलंत्री, पत्रकार ईश्वर महाजन, दिनेश नाईक, संजय सूर्यवंशी, दिनेश पालवे, विशाल देशमुख हे सपत्नीक यजमान होते. मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, तुषार दिक्षीत, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले. त्यांना गोपाल पाठक, प्रवीण भंडारी, चेतन नाईक यांचे सहकार्य लाभले. वादक चंद्रकांत जोशी यांनी त्यांची साथसंगत केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम,  विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी आशा महाले, प्रकाश मेखा, आर. टी. पाटील यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!