नाशिक येथील सहयाद्री फार्मस् आणि सुलावाईन ला भेट
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील बी. व्होक विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने बी. व्होक अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान विभागाची एकदिवसीय सहल दि. ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाली. या सहलीत बी.व्होक विभागाचे २८ पदवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शेती हा एक उत्तम व्यवसाय कसा बनू शकतो ? याबाबत विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन मिळाले
नाशिक येथील सह्याद्री फार्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड आणि सुलावाईन येथे सहल आयोजित केली होती. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ह्या कंपनीत विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांवर विविध प्रकारच्या प्राथमिक प्रक्रिया केल्या जातात. तसेच जगप्रसिद्ध “किसान टोमॅटो केचअप” चे उत्पादन केले जाते. कंपनीच्या प्रशिक्षिका गितांजली पगारे यांनी अन्न प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या विविध अधुनिक यंत्र उपकरणांची माहिती देऊन कंपनीच्या विविध कामांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अन्न प्रक्रिया आणि शेती यांतील व्यवसायाच्या संधी या बद्दलही माहिती दिली. याशिवाय.. नाशिक येथील सुला बीनयार्डस् ही भारतातील मोठ्या प्रमाणावर वाईनचे उत्पादन घेणारी कंपनी आहे. या कंपनीत द्राक्षांच्या रसावर किण्वन प्रक्रिया करून विविध प्रकारच्या वाईन तयार केल्या जातात. त्या बाबतीत कंपनीचे प्रशिक्षक अमृतपाल सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विविध यंत्रसामुग्रीची माहिती दिली.
सहलीच्या नियोजनासाठी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन आणि बी. व्होक विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. एस. डी. बागुल यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. सहलीच्या संयोजिका म्हणून प्रा. सुचित्रा एम. रत्नपारखी यांनी काम पाहिले. या प्रसंगी त्यांच्या समवेत प्रो. नेहा एन. पाटील, प्रो. रागिणी ए. सैंदाणे, प्रयोगशाळा परिचर अक्षय व्ही. सोनार यांनी सह समन्वयक म्हणून भूमिका पार पाडली.