प्रताप महाविद्यालयात दिनांक २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान होणार कार्यशाळा
अमळनेर : आर्ट ऑफ लिव्हिंग, बेंगलोर व प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने रसायनमुक्त शेती अभियान अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रताप महाविद्यालयात दिनांक २५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान श्री श्री नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत राष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेले अशोक साबदे विशेष प्रशिक्षक म्हणून लाभणार आहेत. परमपूज्य श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने ‘बीज बेटी धरती माता बचाव अभियान’ राबविण्यात येत आहे.
सद्यस्थितीत शेतकरी रसायन शेतीमुळे असाह्य झालेला असून विषयुक्त अन्न तयार होत आहे. अशा विषयुक्त अन्नाच्या सेवनाने मानवाच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होत आहेत तसेच पर्यावरण दूषित होत आहे. दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. यावर उपाय म्हणून शून्य लागत नैसर्गिक शेती कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी प्राध्यापक डॉ. पी. बी. भराटे (९४२३९३४७९७), नरेंद्र चौधरी (९४२१९८७९४८), बी. एन. पाटील (७५८८६८७६३१), डॉ. गिरीश बोरसे (९८२३०२४६३६) यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ ए. बी. जैन व खान्देश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.