
अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार ,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आदेशाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर या संस्थेचे नामांतर करण्यात आले आहे. अमळनेर शहराचा ऐतिहासिक वारसा व संत सखाराम महाराजांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन संस्थेचे नामांतर करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी नामांतर सोहळ्यात संस्थेचे नवीन नाव ‘संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाप्रसंगी संत सखाराम महाराज ट्रस्टचे व्यवस्थापक रमेश जोशी, ट्रस्टचे विश्वस्त रविकांत देशमुख, मंदिराचे मुख्य पुजारी दिनेश देव, जनसंपर्क अधिकारी उदय देशपांडे, भक्तनिवास प्रमुख बाळू पगारे, आय एम सी सदस्य प्रा. बापू संदानशिव, संस्थेचे प्र. गटनिदेशक व्ही. पी. वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास संस्थेतील प्राचार्य अनिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील प्र. गटनिदेशक व्ही. पी. वाणी, अनिल दुसाने, डी. एस. पाटील, मनोज चव्हाण, के. व्ही. बिऱ्हाडे, इंगळे मॅडम, नम्रता निकम, सचिन महाजन, सागर पाटील, साईप्रसाद पाटील, दामिनी गोसावी, रोहिणी मासरे, ज्योती दुबे, चेतन जावडेकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर व्ही. पी. वाणी यांनी आभार मानले.