
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत), अमळनेर च्या अंतर्गत एफडीपीचा समारोप दिनांक १४ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या पूज्य साने गुरुजी सभागृहात पार पडला. यावेळी सी.टी.एस.सी, मुंबई येथील चंद्रकांत शर्मा बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव होते. विचार मंचावर प्रमुख मार्गदर्शक चंद्रकांत शर्मा, खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, रुसा समन्वयक व अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्षचे प्रमुख डॉ. मुकेश भोळे, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, डॉ. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, डॉ.योगेश तोरवणे व एफडीपीचे समन्वयक डॉ. अमोल मानके उपस्थित होते.
दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान एफडीपी ची कार्यशाळा संपन्न झाली. या तीन दिवसीय कार्यशाळेत एकूण सहा महत्त्वपूर्ण विविध विषयावर व्याख्याने झाली. उपस्थित प्राध्यापक वर्गास उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना आणि प्राध्यापक एक समुदाय म्हणून परस्पर कौशल्य कसे विकसित करावे तसेच इतरांशी संवाद साधताना आपली देहबोली कशी असावी ? कृत्रिम बुद्धिमत्ता यावर श्री.चंद्रकांत शर्मा (मुंबई) यांनी माहिती दिली. सध्या केंद्र व राज्य शासनाने विद्यापीठीय व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा हा महत्त्वाचा पेपरचा अंतर्भाव केल्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती देण्याच्या दृष्टिकोनातून, संवाद साधण्याच्या दृष्टिकोनातून ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. कार्यशाळेत सुमारे १२२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. समारोप प्रसंगी डॉ. निलेश चित्ते, डॉ.सचिन पाटील, प्रा. वृषाली वाकडे यांना प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.धिरज वैष्णव म्हणाले की, महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम महत्त्वाचा असून या कार्यशाळेमुळे उच्च शिक्षणातील गुणवत्ता कायम राहण्यास मदत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांचे मार्गदर्शन मिळाले. स्टाफ प्रबोधिनी समितीचे सन्माननीय सदस्य डॉ. विजय मांटे, डॉ. रविंद्र मराठे, प्रा. जयेश साळवे, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ.विलास गावित, डॉ.किरण भागवत, प्रा. विजय साळुंखे, डॉ.रामदास सुरळकर यांच्यासह प्रा. निलेश पवार, डॉ. रवी बाळसकर, डॉ. जितेंद्र पाटील, प्रा. संतोष दिपके, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, ग्रंथपाल दिपक पाटील, कुलसचिव राकेश निळे, भटू चौधरी, कैलास पाटील आदींनी सहकार्य केले.
