
अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत एरंडोल विभाग द्वारा आयोजित आंतर महाविद्यालय ज्युदो स्पर्धेचे आयोजन प्रताप महाविद्यालयात करण्यात आले होते. यात प्रताप वरिष्ठ महाविद्यालय ज्युदो पुरुष व महिला दोन्ही संघाने विजेतेपद मिळविले. एरंडोल विभागातील ६ पुरुष व ३ महिला संघ यात सहभागी होते. याप्रसंगी सचिव प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन, जिमखाना समन्वयक डॉ. संदीप नेरकर, प्रा. नितीन पाटील, डॉ. सुनील राजपूत, सचिव व निवड समिती प्रमुख प्रा. किशोर वाघ , डॉ. शैलेश पाटील, डॉ. हर्ष सरदार, प्रा. डॉ. दीपक पाटील, आयोजक क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. अर्चना पाटील, प्रशांत देवकाते, मुख्य पंच यज्ञेश जगताप उपस्थित होते.
खेळाडूंच्या या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष माधुरी देशमुख, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष निरज अग्रवाल, ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, संचालक योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे, प्रदीप अग्रवाल, प्राचार्य डॉ. अरुण बी.जैन, सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, उप प्राचार्य डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. विजय मांटे, सी. सी. एम. सी प्रमुख डॉ. विजय तुंटे, डॉ. योगेश तोरवणे, जिमखाना समन्वयक प्रा. डॉ. संदीप नेरकर, IQAC प्रमुख डॉ. मुकेश भोळे, स्पर्धा आयोजक व क्रीडा संचालक प्रा. डॉ. सचिन पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, रजिस्ट्रार राकेश निळे, प्रा.अर्चना पाटील, प्रशांत देवकाते व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
