नियमित कर भरणाऱ्यांना दोन टक्के व्याज न आकारण्याची काँग्रेस व महाविकास आघाडी तर्फे होतेय मागणी

डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर नगरपालिकेला दिले निवेदन

अमळनेर : अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारण्यात येत आहे. हे व्याज आकारले जाऊ नये यासाठी काँग्रेस व महाविकास आघाडी तर्फे याबाबत डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेला अशा मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख ॲड. रज्जाक शेख, संदीप घोरपडे, तहसील तेली, मनोहर पाटील, लांडगे, गणेश गुप्ता, सुखदेव होलार, छोटू वैद्य आदी उपस्थित होते. नगरपालिकेच्या वतीने कर निरीक्षक चंद्रकिरण शिवदे, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे, आस्थापना प्रमुख लौकिक समशेर यांनी काँग्रेस पक्षाचे हे निवेदन स्विकारले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!