श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव याग

अमळनेर : यंदा येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री कालभैरवजी व माता भैरवी देवी यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरात श्री कालभैरव जयंतीनिमित्त दिनांक २३ रोजी श्री कालभैरव याग अतिशय भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. यागाचे मानकरी डॉ. उदय अहिरराव, जीवन पाटील, चंद्रकांत भानुदास भदाणे, सुरज सराफ, हितेशभाऊ तांबट, हरीओम हिरानंद पंजाबी, डॉ. ज्ञानेश पाटील, प्रा. हेमंत पाटील आणि डॉ. जितेंद्र पाटील हे होते.

सुरुवातीला या नऊ सपत्निक यजमानांच्या हस्ते संकल्प, गणपती पूजन, पुण्याह वाचन, स्थापित देवता आवाहन पूजन, श्री कालभैरव- श्री भैरवी माता पूजन, हवन झाले. त्यानंतर पूर्णाहुती होऊन महाआरतीने यागाची सांगता झाली. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, सुनील मांडे, सारंग पाठक, अबरीश कडवे, अथर्व कुलकर्णी, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अभिषेक भट, अक्षय जोशी, उमेश पाठक यांनी पौरोहित्य केले. पखवाज वादक म्हणून अंकुश जोशी होते. याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सुनिल गोसावी, आशिष चौधरी, बाळा पवार, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, कार्यालय अधिक्षक भरत पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!