● करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या उपक्रमाचा मिळाला लाभ

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटरच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातील विविध जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे नुकतीच निवड झाली आहे.
निवड झालेले विद्यार्थ्यांमध्ये किरण रणछोड जाधव, जितेंद्र निंबा अहिरे, दिनेश चंद्रकांत गोसावी यांचा समावेश आहे . हे तीनही विद्यार्थ्यांनी प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयात शिक्षण घेतले आहे.
स्पर्धा परीक्षेमार्फत जिल्हा निवड यादीतील गुणवत्ता यादी क्रमांक ४९ नुसार किरण रणछोड जाधव याची रायगड जिल्हा न्यायालयात ‘कनिष्ठ लिपिक’ या पदावर निवड झाली आहे. त्याने आपले पदव्युत्तर शिक्षण २०२३-२४ मध्ये घेतले. तो करिअर कौन्सिलिंग सेंटरचा गेल्या पाच वर्षापासूनचा विद्यार्थी होता. गुणवत्ता क्रमांक ४६ नुसार जितेंद्र निंबा अहिरे याची मुंबई उच्च न्यायालयात ‘कनिष्ठ लिपिक’ या पदावर २०२३ च्या भरतीत निवड झाली आहे. त्याने आपले पदव्युत्तर शिक्षण २०२१ मध्ये पूर्ण केले आहे. तो सुद्धा सीसीएमसीचे विद्यार्थी होता. गुणवत्ता यादी क्रमांक ७३ नुसार दिनेश चंद्रकांत गोसावी या विद्यार्थ्यांची अमरावती जिल्हा व सेशन न्यायालयात ‘कनिष्ठ लिपिक’ या पदावर निवड झाली आहे. त्यांने आपले पदवीचे शिक्षण २०२१ मध्ये पूर्ण केले.
त्यांच्या या निवडीबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन, खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. जयंत बी. पटवर्धन, उपप्राचार्य डॉ. अमित पाटील, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे याचप्रमाणे कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधिक्षक देवेंद्र कांबळे, वरिष्ठ लिपिक भटू चौधरी, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष चे प्रमुख डॉ.मुकेश भोळे, डॉ. हर्षवर्धन जाधव, प्रा. संदीप नेरकर, डॉ. सुनिल राजपूत, करिअर कौन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग पाटील, विशाल अहिरे, कैलास पाटील या सर्वांनी विविध जिल्हा सत्र न्यायालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !
