श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) खवशी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन

गुरुचरित्र पारायणाचे हे १५ वे वर्ष

अमळनेर : श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) खवशी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ डिसेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला असून गुरुचरित्र पारायण वाचन करण्यासाठी ५६ महिला व पुरुष सेवेकरी बसले असून सामुदायिक वाचन करीत आहेत. गुरुचरित्र पारायणाचे हे १५ वे वर्ष आहे .

दररोज सकाळी ४ ते ६ गुरुचरित्र वाचन, ६ ते ६.३० भूपाळी आरती, नित्यसेवा वाचन, सकाळी १०.३० नैवेद्य, व संध्याकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती व नित्य सेवा वाचन होत आहे. विशेष म्हणजे १५ वर्षांत गुरुचरित्र पारायण वाचण्याच्या वेळेत थोडाही बदल झाला नसुन कितीही थंडी असली तरी गुरुचरित्र पारायण वाचन दररोज सकाळी वेळेवर पहाटे ४ वाजताच सुरू होते. खवशी गावातील दत्त मंदिराच्या बाजुच्या ग्रामपंचायत समोरील प्रांगणात भव्य मंडप टाकून पारायण होत आहे. दिनांक १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती च्या दिवशी दुपारी १२.३९ वाजता दत्त जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचा कार्यक्रम होवून पारायणाची सांगता होणार आहे. महाप्रसादाचे मानकरी खवशी येथील बापूसाहेब सूर्यकांत विनायक पाटील व सौ. सुनिता सूर्यकांत पाटील आहेत. कार्यक्रमास सर्व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!