
अमळनेर : तालुक्यातील मंगरुळ येथील रहिवासी वासुदेव भिवसन बागुल यांचे शुक्रवार, दिनांक १३ रोजी सकाळी ७ वाजेला वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते ८३ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दिनांक १४ रोजी सकाळी १० वाजेला अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते दिपक बागुल यांचे वडील होत.