सानेगुरुजी वाचनालयात कै. ॲड. मनोहर भांडारकर यांची शोक सभा

अमळनेर : ज्यांनी वाचन संस्कृतीमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. वाचनालयात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असे ॲड. मनोहर भांडारकर यांचे नुकतेच वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. प्रताप महाविद्यालयाच्या मराठी विभागातील वरिष्ठ निवृत्त प्राध्यापिका डॉ. माधुरीताई भांडारकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातू असा परिवार आहे. ते पाडळसरे धरण संघर्ष समितीचे समन्वयक हेमंत भांडारकर यांचे ते वडील होत. ॲड. मनोहर भांडारकर हे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे १९८९ ते १९९३ या कालावधीत अध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे सानेगुरुजी वाचनालयात शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.

ॲड. मनोहर भांडारकर यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक स्तरावर योगदान होते. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष, अमळनेर वकील संघाचे चिटणीस, म. वा. मंडळाचे कोषाध्यक्ष, अहिर शिंपी समाजाचे अध्यक्ष, शनी मंदिर न्यासाचे विश्वस्त, प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राचे सदस्य, ग्राहक पंचायत चे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी चोखपणे सांभाळल्या. रोटरी क्लबमध्ये देखील ते सक्रिय होते. यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक भिमराव जाधव, संयुक्त चिटणीस सुमित धाडकर, ॲड. रामकृष्ण उपासनी, ईश्वर महाजन, प्रसाद जोशी, दिपक वाल्हे, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांचेसह वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे, रमेश सोनार आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!