भारतीय संस्कृती जपण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत इंग्रजी नववर्षाचे स्वागत

मंगळग्रह सेवा संस्था आणि व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रम

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था आणि देशातील क्रमांक एकची पत्रकार संघटना व्हॉईस ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ डिसेंबर रोजी मंगळग्रह मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय संस्कृती जपण्यासाठी पाश्चात्य संस्कृतीला तिलांजली देत इंग्रजी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबर म्हटलं की, सर्वत्र धांगडधिंगा, पार्ट्या, मद्यप्राशन हे आलेच. मात्र भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाद्वारा भारतीय संस्कृतीची जपणूक झाल्याचे चित्र बघावयास मिळाले. सर्वत्र नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मद्यसेवन करून डीजेच्या तालावर थिरकण्याचे प्रकार होत असताना मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांच्या संकल्पनेतून ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात आयोजित भाव-भक्ती भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे पाच तास चाललेल्या या कार्यक्रमाचा असंख्य रसिकांनी मनमुराद आनंद घेतला.

कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शहरातील वेगवेगळ्या म्युझिकल ग्रुपच्या कलाकारांनी एकाच छताखाली येत आपली कला सादर केली. यात, स्वरांजली म्युझिकल ग्रुप, गुरूदेवा ऑर्केस्ट्रा, गीत गाता हू मैं म्युझिकल ग्रुप, नवदुर्गा गायन ग्रुप, सुवर्णकला गायन ग्रुप, त्रिवेणी महिला ग्रुप, जैन बंधु ग्रुप आदींचा समावेश होता. कलाकारांमध्ये स्वरांजली म्युझिकल ग्रुपचे किशोर देशपांडे, नेहा किशोर देशपांडे, मिलींद पाटील, विद्या पाटील, पूनम अग्रवाल, प्रदीप शिंगाणे, युगछाया शिंगाणे, रवींद्र माळी, देविदास बिरारी, नितीन गुरव होते. याशिवाय अन्य कलाकारांमध्ये शरद सोनवणे, अपेक्षा पवार, सतिश कांगणे, सविता देशमुख, स्नेहा एकतारे, मनिषा गवते, सुभाष सोनवणे, प्रा. व्ही. आर. पवार, वसुंधरा लांडगे, सुयश जैन, पुष्कर जैन, अर्चना शहा, हेमंग झाबक आदींनी विविध भावगीते, भक्तिगिते सादर केली.

दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मध्यंतरात उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री १२ वाजता मंगळग्रह देवतेची महाआरती होऊन केशरयुक्त दूध प्राशनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक हरी भिका वाणी, सीए नीरज अग्रवाल व माधुरी पाटील, प्रा. अशोक पवार, अ‍ॅड. ललिता पाटील, संदीप घोरपडे, जितेंद्र जैन, रणजित शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, स. सु. बोरसे यांच्यासह रोटरी क्लब, लायन्स क्लब, शहरातील विविध महिला मंडळ, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, भाऊसाहेब देशमुख, अजय भामरे, सुखदेव ठाकूर, उमाकांत ठाकूर, बापूराव ठाकरे, मधुसूदन विसावे, दिनेश नाईक, संजय पाटील, किरण चव्हाण, जगदीश पाटील, पंकज पाटील आदी पदाधिकारी व असंख्य रसिक श्रोते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, पुषंद ढाके, माजी नगरसेवक विनोद कदम, बाळा पवार, विनोद अग्रवाल, शरद कुलकर्णी, मनोहर तायडे, हेमंत गुजराथी, रवींद्र मोरे, जितेंद्र पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष उमेश काटे व दयाराम पाटील यांनी केले तर जिल्हा संघटक जयेश काटे यांनी आभार मानले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!