
अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रगीत नंतर अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ. वंदना पाटील व प्रा. शालिनी पवार यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर, त्यांचे विचार व कार्य संदर्भात उजाळा दिला.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे सहसचिव डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. पराग पाटील, डॉ. अमित पाटील, डॉ. व्ही. बी. मांटे, डॉ. कल्पना पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. अभिवादन सभेच्या नियोजनात प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, डॉ. धिरज वैष्णव यांनी सहकार्य केले.