प्रा. डॉ. लिलाधर पाटील व सहकारी लिखित पुस्तकाचे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन

अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. लिलाधर पाटील, डॉ. भूपेंद्र कस (जळगाव), डॉ. जगदीश पाटील (फैजपूर) व डॉ. हेमंत पाटील (म्हसदी) यांनी लिहलेल्या ‘इंग्लिश फॉर ऑल: ए कोर्स इन कम्युनिकेशन स्किल’’ या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस निर्मित पुस्तकाचे प्रकाशन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आले. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी विद्यापीठात संपन्न झालेल्या या प्रकाशन प्रसंगी केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस चे पश्चिम विभागाचे प्रमुख रंजन गुप्ता, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एस. टी . इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल डोंगरे, आंत्रविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. टी . भुकन आदी मान्यवर हजर होते. प्रकाशित झालेले पुस्तक हे पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्याशाखेच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासाला असणार आहे.

‘केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ ही ४९० वर्षांपासून प्रकाशन क्षेत्रात जागतिक पातळीवर कार्य करणारी नामांकित संस्था असून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित हे पहिले पुस्तक प्रकाशित करतांना आनंद होत असल्याचे सांगून हा प्रवास पुढेही सुरु राहावा यासाठी प्रत्यनशील राहू’ असे मनोगत रंजन गुप्ता यांनी व्यक्त केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी लेखक व प्रकाशक यांचे अभिनंदन केले व विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी काही संयुक्त प्रयत्न करता येतील का या विषयी चर्चा केली.

धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी . पाटील व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन के. डी. पाटील यांनी ‘नामांकित प्रकाशन संस्थेकडून पुस्तक प्रकाशित होणे ही आनंदाची व अभिमानाची बाब असल्याचे सांगून धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!