पत्रकारदिनी व्हॉईस ऑफ मीडिया व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरला सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर

गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांचे बहुमोल सहकार्य

अमळनेर : येथील व्हॉईस ऑफ मीडिया व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त सोमवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी वाणी मंगल कार्यालय, अमळनेर येथे मोफत भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांचे बहुमोल सहकार्य मिळाले आहे. शहरातील प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता महाआरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे. विशेष अतिथी व शुभेच्छुक म्हणून आपण आमंत्रित आहात.

सर्व पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते व वाटप करणारे आणि श्री मंगळग्रह मंदिराचे सेवेकरी या सर्वांचे कुट्ंबीय यांची मोफत भव्य महाआरोग्य तपासणी व पात्र गरजूंची मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस तथा मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष उमेश काटे, सर्व पदाधिकारी व सदस्य व्हॉईस ऑफ मीडिया आणि मंगळग्रह सेवा संस्था यांनी केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!