शिरुड विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमनपदी बापुराव महाजन; व्हाईस चेअरमनपदी धोंडू पाटील

अमळनेर : तालुक्यातील शिरुड येथे दि. ११ जानेवारी २०२५ रोजी विविध कार्यकारी सह. सोसायटी च्या चेअरमनपदी बापुराव भिवसन महाजन, तर व्हा. चेअरमनपदी धोंडू हिंमतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले तर सचिव रविंद्र पुंजू पाटील यांनी सहकार्य केले. ठरल्याप्रमाणे चेअरमन मीराबाई विश्वास पाटील व व्हाईस चेअरमन अनंतराव धनाजी मोरे यांनी राजीनामा दिला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मा. प्रशासक तिलोत्तमा पाटील, कृ.उ बा स. संचालक सुभाष पाटील, पंचायत समिती माजी सभापती शाम अहिरे, सरपंच गोविंदा सोनवणे, वि. का. सो सदस्य सविता पाटील, वासुदेव पाटील, भास्कर पाटील, अरुण पाटील, सिताराम पाटील, गोरख धनगर, सुभाष महाजन, तसेच गावातीलच विरभान पाटील नंदलाल पाटील, वसंत पाटील, अतुल सोनवणे, विनोद सोनवणे, अजय बोरसे, अंकित पाटील, यशवंत बैसाने, आनंदराव पाटील, सागर पाटील, बापू मोरे आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!