प्रताप महाविद्यालय ग्रंथालय विभागामार्फत एकदिवसीय वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालय ग्रंथालय विभागामार्फत एकदिवसीय वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम साजरा करण्यात आला. प्रा. नितीन पाटील यांनी वाचन कौशल्य कार्यशाळेत वाचन कसे व का करावे ? वाचनाचे फायदे, स्पर्धा परीक्षेतील व्याकरण व महत्व, प्रसिद्ध लेखक लेखकांची वाचन कौशल्य विविध उदाहरणांसह विद्यार्थ्यांना समजून सांगितले. दिवसभरात एक पेज वाचन तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. जैन यांनी महाविद्यालयात एवढी संसाधने ग्रंथालयात असताना देखील वाचन प्रमाण विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये कमी असल्याचे नमूद केले. वाचन संस्कृती व वाचन कौशल्य यामध्ये कशी वृद्धी करता येईल ? याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. रमेश माने यांनी वाङ्ममयीन लेखन कौशल्ये विषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘निवडक परंतु ठळक घटना प्रसंगाची निवड करून समर्पक शब्द वापरुन साहित्य निर्मिती करावी. साहित्य निर्मितीचा एक वेगळा आनंद असतो. ती अनुभूती आनंददायी असते. साहित्य हे उत्तम समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. उत्कृष्ट लेखनासाठी उत्तम वाचन, चिंतन आणि मननाची आवश्यकता असते. लेखकाने आपल्या भूमी आणि भूमिकेशी ठाम असले पाहिजे’ असे प्रतिपादन केले. प्रा. डॉ. रमेश माने, प्रा. नितीन पाटील, प्रा. विजय तुंटे, प्रा. डॉ. प्राचार्य ए. बी. जैन, प्रा. डॉ. विजय एस. तुंटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. वाय. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. डी. आर. पाटील यांनी केले. कार्यशाळेसाठी ग्रंथालयीन शिक्षकेतर कर्मचारी रविंद्र माळी, नितीन सोनार यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!