अमळनेर अर्बन बँकेने शाखा विस्तार करुन परिसरातील लोकांना उत्कृष्ट सेवा द्यावी : प.पू श्री संत सखाराम महाराज

अर्बन बँकेच्या मुख्य बँकिंग सुविधांनी संपन्न नूतन सभागृहाचे उद्घाटन तसेच बँकिंगची सहज सुलभ माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चे झाले प्रकाशन

अमळनेर : येथील अमळनेर अर्बन बँकेने शाखा विस्तार करुन परिसरातील लोकांना आर्थिक क्षेत्रातील अमळनेर सारखी उत्कृष्ठ सेवा द्यावी असे प्रतिपादन प्रतीपंढरपूर वाडी संस्थानचे गादीपती प.पू श्री संत सखाराम महाराज यांनी केले. अमळनेर को-ऑप.अर्बन बँकेच्या अद्ययावत आधुनिक अश्या बँकिंग सुविधांनी संपन्न नूतन सभागृहाच्या उद्घाटन व सहज सुलभ बँकिंग ची माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चा प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ उपस्थित होत्या. दि अमळनेर को. ऑप. अर्बन बँकेचे शतक महोत्सवी वर्षात पदार्पण होत असताना अमळनेर को.ऑप. अर्बन बँकेचे आधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न असे सभासद व ग्राहकाभिमुख अद्ययावत नूतनीकरण केलेले मुख्य कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रथमच सभासद, ग्राहकांना बँकिंगची सहज सुलभ माहिती देणारी दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन परमपूज्य संत श्री सखाराम महाराज यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीस बँकेच्या सभागृहातील श्री गणेश मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प.पू संत श्री सखाराम महाराज यांचे पाद्यपूजन बँकेचे चेअरमन पंकज गोविंद मुंदडे यांनी केले.

बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा मांडताना “अमळनेर अर्बन बँकेने शंभर कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा यशस्वीपणे गाठला असून बँक डिजिटल व ऑनलाईन करण्यासह सभासद व ग्राहकांना सेवा देण्याच्या उद्देशाने आधुनिक व अध्यायवत अशा सुविधांनी परिपूर्ण करीत असून बँकेच्या भविष्यातील वाटचालीत अमळनेरच्या वैभवात व लौकिकात भर टाकण्याचे काम संचालक मंडळ करेल असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना अमळनेर अर्बन बँक सभासदांच्या विश्वासाची बँक आहे. बँकेच्या प्रगतीसाठी शासन स्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य करू.आम्ही बँकेच्या सतत पाठीशी आहोत.असे खा.स्मिताताई वाघ यांनी सांगितले. प्रास्ताविकात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमृत पाटील यांनी बँकेच्या योजनांची आर्थिक उलाढालीची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांचेसह संचालक प्रविण जैन, मोहन सातपुते, पंडित चौधरी, भरत ललवाणी, प्रदिप अग्रवाल, अभिषेक पाटील, लक्ष्मण महाजन, दिपक साळी, प्रविण पाटील, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनिषा लाठी, ॲड. व्ही. आर. पाटील, विजय बोरसे, बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील आदी उपस्थित होते.

अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी कार्यरत कुशल संचालक मंडळाला आणि कर्मचारी वर्गाला अर्बन बँकेचे माजी संचालक कुंदन शेठ अग्रवाल, गोविंद दादा मुंदडे, बजरंगशेठ अग्रवाल, विनोदभैय्या पाटील, सुभाष चौधरी, प्रविणबापू पाटील, डॉ. शशांक जोशी, जयेश शहा, लालचंद सैनानी, प्रतिष्ठित व्यावसायिक सरजूशेठ गोकलानी, रामदास निकुंभ, राजीव मुंदडे, प्रकाश मुंदडे, जितेंद्र जैन, मुरलीशेठ बितराई, खा.शि. मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी शुभेच्छा दिल्यात. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. किरण पाटील, ॲड. आर. डी. चौधरी, ॲड. विवेक लाठी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत , किरण पाटील, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, पत्रकार राजकुमार छाजेड यांचेसह दशरथ लांडगे, मा. उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, मा. नगरसेवक विनोद कदम, राजू फाफोरेकर, विवेकानंद भांडारकर, बाळासाहेब देशमुख, प्रसाद शर्मा, दिलीप देशमुख, संजय कासार, शितल देशमुख, नरेंद्र निकुंभ, कुंदन निकम, दत्ता कासार, अनिलदादा जोशी, प्राचार्य रविंद्र सोनवणे, श्रीमती चावरीया, दिलीप भावसार, अनिल रायसोनी, जितेंद्र कटारिया, महावीर पहाडे, प्रशांत सिंघवी, डी. आर. पाटील, आदींसह बँकेचे ज्येष्ठ सभासद, माजी संचालक, माजी कर्मचारी व पिग्मी एजेंट, बँकेचे ग्राहक, विविध क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर अर्बन बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद ,पिग्मी एजेंट यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!