घोडगाव येथील जयकुमार पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत गुणवत्ता यादीत

महाराष्ट्र राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण

अमळनेर : चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील कै. नथू दोधू पाटील यांचा नातू व ज्येष्ठ पत्रकार तथा धुळे जिल्हा मराठा सेवा संघाचे वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचा मुलगा जयकुमार पाटील हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) “महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा २०२३” गुणवत्ता यादीत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. जयकुमार चे आई वडील शिक्षक असून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार वाटचाल यशस्वी झाली आहे आपल्या आयुष्यात कुटुंबातील सर्वांचेच आशीर्वाद व गुरुजनांच्या शिदोरी मुळे हे यश मिळाले आहे. जयकुमार ने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!