
अमळनेर : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त शहरातील कोर्ट परिसरातील स्मारकाजवळ आज शिवसेना (शिंदे गट) तर्फे जयंती साजरी करण्यात आली. पाडळसरे धरण समितीचे अध्यक्ष सुभाषअण्णा चौधरी, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या हस्ते हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेश देशमुख, शहर संघटक साखरलाल महाजन, धर्मवीर सेनेचे डी. बहिरम, युवा सेना शहर प्रमुख भरत पवार, उपशहर प्रमुख प्रविण पाटील, गुणवंत पाटील, समाज सेवक अनंत निकम, आरोग्य सेवक प्रमोद शिंपी, शिवसैनिक करण जाधव, भैया भाऊ, प्रितम पाटील, पंकज पाटील, पांडू भोई आदी शिवसैनिक उपस्थित होते.