पष्टाणे खुर्द येथे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्राम संमेलन उत्साहात

पष्टाणे माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक दयाराम पाटील व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका वाणी मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

धरणगाव : तालुक्यातील पष्टाणे खुर्द येथे दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी म्हणजे संविधानाच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त ग्राम संमेलनातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव जी. पाटील, जेडीसीसी बँक जळगाव चेअरमन संजय पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल बापू चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य पी. सी. आबा पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, माजी समन्वय समिती धरणगाव चे डी. जे. पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, पंचायत समिती धरणगाव येथील गटशिक्षणाधिकारी श्रीमती भावनाताई भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील तथा कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव माननीय प्रेम राज पाटील सोनवद, माजी पंचायत समिती सदस्य कैलास पाटील, तालुका अध्यक्ष सरपंच परिषद धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, तहसीलदार धरणगाव पवन जी देसले, पोलीस निरीक्षक धरणगाव आर. व्ही. पाटील, सरिता ताई कोल्हे महिला जिल्हा अध्यक्ष शिवसेना, गोविंदा मिस्तरी केंद्रप्रमुख केंद्र पष्टाणे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व या धकाधकीच्या जीवनातून ग्रामस्थांना एक विरंगुळा मिळावा व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पष्टाणे येथील ग्रामस्थांतर्फे ग्राम संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.

उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना प्रतापराव पाटील यांनी ग्रामसंमेलन हा अभिनव उपक्रम असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना यातून वाव मिळतो असे प्रतिपादन केले. प्रा. अशोक पवार यांनी आपल्या मनोगतात पष्टाने येथील ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले. मी पहिल्यांदाच असे ग्राम संमेलन पाहतो आहे असा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमात सादरीकरण झालेल्या माध्यमिक विद्यालयातील आदिवासी गीताला भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्या कलागुणांना वाव देणारे माध्यमिक विद्यालय, पष्टाणे येथील उपशिक्षक दयाराम आनंदराव पाटील तसेच जिल्हा परिषद शाळेतील वाणी मॅडम यांना ग्रामपंचायतीतर्फे स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात विशेष कलागुण सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भविष्यात असे उल्लेखनीय काम करणाऱ्यांना ग्रामपंचायत तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार असेही जाहीर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक दयाराम पाटील यांनी केले. ग्राम संमेलन कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच बाहुबली ऑर्केस्ट्रा पष्टाणे बुद्रुक व पष्टाणे खुर्द येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!