
धुळे : जिल्ह्यातील नरव्हाळ येथील रहिवासी व एस एन डी टी महिला महाविद्यालय धुळे येथील प्रा.भारती माधवराव सोनवणे /आढावे ( M.A. SET ) यांना हिंदी विषयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरु यांच्या हस्ते पीएचडी ( Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली. धुळे तालुक्यातील गरताड येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील व्ही. आढावे यांच्या त्या धर्मपत्नी आहेत. यावेळी मार्गदर्शक प्रा. डॉ. योगेश पाटील उपप्राचार्य विद्यावर्धिनी कॉलेज धुळे, अध्यक्ष प्रा. डॉ. पंढरीनाथ पाटील हिंदी विभागाध्यक्ष महाविद्यालय नगाव तसेच बहिस्थ परीक्षक प्रा. डॉ. अमोल पालकर बलभीम महाविद्यालय बीड हे उपस्थित होते. त्यांना प्रा. डॉ. मृदुला वर्मा, (HOD जयहिंद सिनियर कॉलेज, धुळे ) यांचे सहकार्य लाभले.
