प्रताप महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न

अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष, रुसा, करिअर कौन्सिलिंग सेंटर, युनिक अकॅडमी, पुणे यांचा संयुक्त उपक्रम

अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून द युनिक अकॅडमी, पुणेचे संस्थापक तुकाराम जाधव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सहचिटणीस डॉ. धिरज वैष्णव होते. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे, डॉ. व्ही. बी. मांटे, डॉ. अमित पाटील, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे, प्रा. डॉ.रवींद्र माळी, अशोक बिऱ्हाडे, डॉ. जितेंद्र पाटील उपस्थित होते.

आपल्या मनोगतात तुकाराम जाधव म्हणाले की, स्पर्धा परीक्षेत लाखो विद्यार्थी बसतात, पण टिकतात कमी. स्पर्धा परीक्षेची रचना कशी असते, त्यात कोण कोणते बदल झाले आहेत ? याची सविस्तर माहिती दिली. स्पर्धा परीक्षेला सामोरे जातांना वाचन व लेखन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे नियोजन करताना संपूर्ण परीक्षेची माहिती असायला हवी. विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेची माहिती असायला हवी. वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकातून विषयाची तयारी करावी. अभ्यासक्रम व्यतिरिक्त स्वतःकडे शब्दसाठा व लेखन वाढवणे गरजेचे आहे. लेखन करताना व्याकरणाचा आधार घेऊन योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करावा अशा टिप्स आपल्या व्याख्यानातून दिल्या.

या मार्गदर्शन व्याख्यानासाठी डॉ. रवी बाळसकर, ग्रंथपाल दीपक पाटील, प्रा. पुष्पा पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विलास गावित, प्रा. विजय साळुंखे, प्रा. नितेश कोचे, प्रा. रोहन गायकवाड, डॉ. बालाजी कांबळे, डॉ. राखी घरटे, प्रा. सोनूसिंग पाटील, डॉ. हर्ष नेतकर, प्रा. दिलीप तडवी, प्रा. सचिन आवटे, प्रा. अमोल अहिरे, प्रा. हिमांशू गोसावी, डॉ. प्रदिप पवार, प्रा. सपकाळे, युनिक अकॅडमीचे नरेंद्र पाटील, विकास गिरासे, शिखर अकॅडमीचे ॲड. चंद्रभान पाटील याचप्रमाणे करिअर कोन्सिलिंग सेंटरचे दिलीप शिरसाट, कैलास पाटील, पराग पाटील, विशाल अहिरे, अतुल धनगर, अक्षय सोनार, प्रशांत पाटील, पवन राजपूत, स्वप्निल राजपूत आदींनी विशेष सहकार्य केले. यावेळी १५ दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित आदित्य पाटील, जान्हवी जोशी, मोहिनी पाटील व कुणाल वाडीले या विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रमेश माने यांनी केले. तुकाराम जाधव यांचा परिचय करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी करून दिला. कोर्स समन्वयक डॉ. जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. व्हायोलीन वाद्याद्वारे राष्ट्रगीत सादर करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!