मियामी विद्यापीठ आयोजित आंतरराष्ट्रीय हॉकेथॉन स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील दोघे चमकले

चौबारी येथील मधुर पाटील, बोहरा येथील अनुराग अहिरराव यांचेसह टीमने तिसरे पारितोषिक पटकावले


अमळनेर : पुणे एम आय टी डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ कॉम्प्युटिंगचे विद्यार्थी अमळनेर तालुक्यातील बोहरा येथील रहिवासी अनुराग गोकुळ अहिरराव व चौबारी येथील रहिवासी मधुर प्रशांत पाटील यांचेसह टीममधील अर्णव बुळे आणि निधी फोफळीये यांनी हॉरीझॉन एआय हॉकेथॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनुराग हा निंभोरा आश्रम शाळेचे शिक्षक गोकुळ पाटील यांचा चिरंजीव आहे तर मधुर पाटील हा अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील रहिवासी तथा पाटील ॲग्रो, अमळनेर चे संचालक प्रशांत तुळशीराम पाटील यांचा चिरंजीव आहे.

मियामी विद्यापीठाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, सिकल सेल डीटेक्टर या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी अनुराग अहिरराव, मधुर पाटील, अर्णव बुळे, आणि निधी फोफळीये यांनी या स्पर्धेचे एक हजार डॉलर्सचे तिसरे पारितोषिक पटकावले आहे. ‘सिकल सेल डिटेक्टर’ हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर( ए आय) आधारित उपाय असून जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार केला आहे. विशेषत: दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी मदत करू शकतो. एआय च्या मदतीने निदान आणि उपचार पद्धती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी प्रा.डॉ. रंजना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तुत्वाची छाप पडली. विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड. कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. , प्र. कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजारी, डॉ.मोहित दुबे, सचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. सुरेश कापरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अनुराग व मधुर चे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!