
अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी श्रीमती सुमनबाई गोरख सूर्यवंशी यांचे आज शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. गुलाब सूर्यवंशी यांच्या त्या आई होत. खवशी येथील निवासस्थानापासून उद्या रविवारी अंत्ययात्रा निघणार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !