
अमळनेर : प्रताप महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, व तृतीय वर्ष (बी. एस्सी.) च्या विद्यार्थ्यासाठी नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२५ (EQC-२०२५) चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ. अरुण. बी. जैन, तसेच IQAC व RUSA समन्वयक डॉ. मुकेश पी. भोळे उपस्थित होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विविध फेऱ्या घेवून इलेक्ट्रॉनिक्स विषयाशी निगडित प्रश्न विचारण्यात आले. त्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय विजेता विद्यार्थी व विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. तसेच विजेते विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत तसेच कांस्य पदकासह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषण करतांना प्राचार्य डॉ. अरुण. बी. जैन म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा व आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करुन स्वतःच्या उज्वल भविष्यास नवी दिशा द्यावी. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन प्रा. वृषाली वाकडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. प्रियंका पाटील यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मुकेश भोळे, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. कल्याणी पाटील, प्रा.अमोल अहिरे, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी भगवान पाटील, पंकज भदाणे, दिपक चौधरी मंगला पाडवी व तृतीय वर्ष विद्यार्थी (इलेक्ट्रॉनिक्स) यांचे अनमोल सहकार्य लाभले.