उद्या बडौदा येथील राहत्या घरून निघेल अंत्ययात्रा

जळगाव : तारखेडा खुर्द तालुका पाचोरा येथील मूळ रहिवाशी तथा नौकरी निमित्त बडौदा येथे वास्तव्यास असलेले वामनराव दौलतराव पाटील यांचे आज बुधवार, दि.५ मार्च रोजी सकाळी ९.२० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते ८५ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, जावाई, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. राजेश पाटील, विजय पाटील, दिनेश पाटील यांचे ते वडील होत. आपल्या सेवानिवृत्ती पर्यंत त्यांनी पोलीस दलात सेवा दिली आहे.
गुरुवार, दिनांक ६ मार्च रोजी त्यांची अंत्ययात्रा ८- जयरत्न सोसायटी, अयप्पा टेम्पल समोर, बडौदा येथील राहत्या घरून सकाळी ९ वाजता वडीवाडी स्मशानभूमी येथे नेणार आहेत. त्यांच्या निधनामुळे परिवारावर जे दुःख कोसळले ते सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो. समस्त श्री मराठा पाटील समाज संघटना बडौदा व दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..!