प्रा. डॉ. अर्चना पाटील लिखित “महिला सबलीकरण आणि समाजकार्य” पुस्तकाचे झाले प्रकाशन

प्रा. डॉ. अर्चना पाटील लिखित “महिला सबलीकरण आणि समाजकार्य” पुस्तकाचे झाले प्रकाशन

अमळनेर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रा. डॉ. अर्चना पाटील यांचे स्वलिखित “महिला सबलीकरण आणि समाजकार्य” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १२ मार्च रोजी अमळनेर येथे नुकताच संपन्न झाला. डॉ. अर्चना पाटील सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी, नंदुरबार येथे टिचींग असोसिएट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन “शाश्वत विकासासाठी शांतता, न्याय आणि सुसंवाद” या राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने करण्यात आले. प्रकाशन सोहळ्यास श्रम साफल्य एज्यु. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब भांडारकर, अध्यक्ष अभिजित भांडारकर, सचिव सौ. गीता भांडारकर, तसेच अनेक नामवंत शिक्षणतज्ज्ञ व समाजकार्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

“महिला सबलीकरण आणि समाजकार्य” हे पुस्तक समाजकार्य विभागाच्या बी.एस.डब्ल्यू. आणि एम.एस.डब्ल्यू. अभ्यासक्रमासाठी अत्यंत उपयुक्त असून, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.सदर पुस्तक अथर्व पब्लिकेशन यांनी प्रकाशित केले असून, महाविद्यालयाच्या ग्रंथालयातही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल.

याप्रसंगी डॉ. विनोद प्रभाकर पाटील (कुलसचिव, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ), प्रा. डॉ. जगदीश पाटील ( अधिष्ठाता मानवविद्या विभाग, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), प्रा. अंबादास मोहिते ( प्राध्यापक आणि संस्थापक अध्यक्ष मास्वे ) , डॉ. वाय.जी. महाजन (अध्यक्ष, अभ्यास मंडळ, समाजकार्य विभाग ,क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ), डॉ. एस.एन. देसाई (माजी कुलसचिव, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ), डॉ. नितीन बारी ( एन मुक्ताचे अध्यक्ष), प्रा. डॉ. कांचन महाजन ( सिनेट सदस्य क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ) डॉ. धीरज वैष्णव (सिनेट सदस्य, क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव), डॉ. व्ही.आर. गुंजाळ (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, मोराणे धुळे), डॉ. राकेश चौधरी (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय जळगाव), डॉ. पी. एस. पाटील (प्राचार्य, समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर), प्रा.डॉ. श्याम दामू सोनवणे, ( समाजकार्य महाविद्यालय जळगाव) प्रा. डॉ. जगदिश सोनवणे (समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर ) डॉ. रघुनाथ महाजन (समाजकार्य महाविद्यालय, मोराणे), डॉ. ए. व्ही. देशमुख (समाजकार्य महाविद्यालय, चोपडा) आदी मान्यवर यांच्या उपस्थित पार पडला . तसेच, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व कर्मचारी ह्या सोहळ्यास उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!