
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयतील इतिहास विभागाचा तृतीय वर्ष आणि एम ए. अंतिम वर्ष विद्यार्थ्यांंना निरोप समारंभ कार्यक्रम १७ मार्च रोजी नाट्य सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारोपाच्या कार्यक्रमात इतिहास विषयाचा तृतीय वर्ष व एम ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहचिटणीस डॉ. धिरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे, उपप्राचार्या डॉ. कल्पना पाटील, रुसा आणि आय. क्यु. ए.सी.समन्वयक डॉ. मुकेश भोळे, परीक्षा नियंत्रक प्रा. शशिकांत जोशी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी इतिहास विभागाने वर्षभरातील केलेल्या कार्याचा आढावा घेऊन इतिहास शिकणारा विद्यार्थी इतिहास घडवतो असे प्रतिपादन केले. सरस्वती देवीच्या प्रतिमेच्या पूजन व माल्यार्पण नंतर एम ए द्वितीय वर्षाची कु. भाग्यश्री महाले या संशोधक विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले. नियमित हजेरी संशोधन व अध्ययन कार्य, उत्कृष्ठ व आदर्श, विनम्र विद्यार्थी म्हणून जावेद रफीक मन्यार या होतकरू विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांनतर डॉ. धिरज वैष्णव, डॉ. विजय तुंटे, डॉ. कल्पना पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. ए. बी. जैन यांनी NEP चे महत्व समजावित शिक्षण पूर्ण झाले असले तरी संशोधनातून रोजगार निर्माती करावे, असे मार्गदर्शनात सुचित केले. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मनोरंजन व कलाकृतींचे सादरीकरण केले. सादरीकरणातून भारतीय संस्कृती व परंपरांचे दर्शन निदर्शनास आले. यावेळी इतिहास विभागातील प्रा. भाग्यश्री जाधव, प्रा. विजय साळुंखे, प्रा. अवित पाटील, प्रा. प्रसाद मुठे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मयूर जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महिमा पाटील, चेतना महाजन, अक्षय पाटील, राहुल पाटील, हरी चौधरी, सागर भोई आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. बापू लोटन पाटील, विजय जाधव, साबीर शेख या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सहकार्य केले.