रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर ‘प्रताप’ चे ई-वेस्ट व्यवस्थापनावर पथनाट्याद्वारे जनजागृती

 

अमळनेर : प्रताप महविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी नुकतेच १५ मार्च २०२५ रोजी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर “ई- वेस्ट (इलेक्ट्रॉनिक –कचरा) नाही वेस्ट” हे प्रभावी पथनाट्य सादर करून ई-वेस्टच्या योग्य निवारणाचे महत्व लोकांपर्यंत पोहचविले. “ई-वेस्टचे योग्य व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण” या मुख्य संदेशावर आधारित विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर नाटक सादर केले. या नाटकात, विविध दृष्य द्वारे विद्यार्थ्यानी ई –वेस्ट खूप घातक असू शकतात आणि त्यांना योग्य प्रकारे रिसायकल किंवा निवारण करणे आवश्यक आहे हे पटवून दिले.

नाटकात विद्यार्थ्यांनी रीसायकलिंग, पुनर्वापर, आणि ई-वेस्टच्या योग्य निवारणावर जनमाणसांचे लक्ष केंद्रित केले. स्थानकांवर प्रवासी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांचा संदेश स्वीकारला. नाटकाच्या शेवटी, सर्वांनी एकत्र येऊन “ई-वेस्ट व्यवस्थापन करा, पर्यावरण वाचवा!” या घोषणेसोबत ई-वेस्टच्या योग्य निवारणाची शपथ घेतली. महाविद्यालायचे माननीय प्राचार्य डॉ.ए.बी.जैन यांचा परवानगीने आणि विभागाचे प्राध्यापक डॉ.मुकेश भोळे, प्रा.वृषाली वाकडे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा.अमोल अहिरे, प्रा. कल्याणी पाटील यांचा मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास रेल्वे स्थानक व्यवस्थापक अनिल बी. पाटील व इतर अधिकारी तसेच बस स्थानक व्यवस्थापक चौधरी यांनी देखील या जागरूकता मोहिमेला समर्थन देत ई-वेस्टवर आधारीत नाटक सादर करण्यासाठी सहकार्य केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!