आदिवासी विकास विभाग व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप

आदिवासी बांधवांनी जैन हिल्स येथे विविध पिकांच्या डेमो प्लॉट भेट देऊन घेतली माहिती

 

जळगाव : आदिवासी विकास विभाग व जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या वतीने नुकतेच दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, यात यावल, रावेर, चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातून १२०० हुन अधिक आदिवासी बांधव उपस्थित होते. समारोप प्रसंगी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या नूतन सिइओ मिनल करणवाल, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांनी जैन हिल्स विविध पिकांच्या डेमो प्लॉट ला भेट देऊन माहिती घेतली. आदिवासी विकास विभागाद्वारे पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारक (IFR) यांच्यासाठी सामूहिक योजनांच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रनिहाय मसाला समूह (Cluster/Spice Cluster) तयार करण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेतील महत्त्वाचे मुद्दे …

  • IFR धारकांसाठी आर्थिक संधी आणि उत्पादन क्षमता वाढवणे.
  • मसाला लागवडीसाठी गट पद्धतीने काम करण्याचे फायदे
  • कृषी प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ संधी
  • वनहक्क धारकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ

या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीस चालना मिळेल आणि स्थानिक पातळीवर कृषी प्रक्रिया उद्योगांना गती मिळेल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!